13th AUGUST 1890 – 5th MAY 1918 – BALKAVI ALIAS TRYAMBAK BAPUJI THOMRE – FAMOUS FOR NATURE POEMS

१३ ऑगस्ट १८९०  ते  ५ मे १९१८ बालकवि उर्फ़ त्र्यंबक बापूजी ठोमरे – निसर्ग  कवि म्हणून प्रसिद्ध 

बालकवी

(१३ ऑगस्ट १८९० ते ५ मे १९१८)
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे. निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध.

bal kavi.jpg
निसर्गकवी म्हणून अढळ स्थान मिळालेल्या बालकवींनी आनंद आणि उदासीनता या दोन्ही भावनांना आपल्या कवितांमधून पकडून ठेवलं. अल्पायुषी ठरलेल्या बालकवींची कविता निसर्गातील प्रतिमांच्या आसपासच फिरली, पण त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या नि शब्दकळेच्या जोरावर निसर्गातील निरागसता कवितेत आणली. मग आनंद असो की उदासीनता, या दोन्ही भावना त्यांच्या कवितेत निरागस होऊन येतात. निसर्गाला मानवी भावभावनांची जोड दिल्याने बालकवींची कविता रूढ अर्थाने दिसणाऱ्या निसर्गवर्णनापेक्षा वेगळी ठरली. ‘आनंदी आनंद’ ही त्यांची प्रसिद्ध आणि पाठ्यपुस्तकांतील समावेशामुळे लोकांमधे अधिक रुळलेली कविता. त्यात ते म्हणतात-

आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहिंकडे
वरती खालीं मोद भरे,
वायूसंगें मोद फिरे,
नभांत भरला,
दिशांत फिरला,
जगांत उरला,
मोद विहरतो चोहिंकडे
आनंदी आनंद गडे!
याच बालकवींची ‘उदासीनता’ या शीर्षकाची कविता अशी आहे-
कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला?
काय बोंचते तें समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला?
येथें नाहीं तेथें नाही
काय पाहिजे मिळवायाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हांका मारी जीव कुणाला?
मुक्या मनाचे मुके बोल हे;
घरें पाडिती पण हृदयाला!
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला?
वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी अपघाती निधन झाल्यामुळे बालकवींचं कवितालेखनही अनेक अर्थांनी मर्यादितच राहिलं. त्यांना जेमतेम दहा-बारा वर्षं कवितालेखन करता आलं, आणि त्यांच्या एकूण कवितांची संख्याही आहे केवळ एकशे त्रेसष्ट.
बालकवींचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथे झाला. त्यांचे वडील बापूराव देवराव ठोमरे पोलिसखात्यात नोकरीला असल्याने त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात अडथळे आले. बालकवींना चार भावंडं होती. जिजी ही थोरली बहीण त्यांच्या विशेष जवळची होती. शिवाय अमृतराव आणि बाबू हे दोन भाऊ आणि कोकिळा ही बहीण होती. स्वदेशी, स्वराज्य अशा देशभक्तीच्या तत्कालीन कल्पनांच्या प्रभावामुळे बालकवींना तसेच त्यांच्या वडिलांना इंग्रजी शिक्षणाबाबत उत्साह नव्हता. त्यामुळे बालकवींचा बराचसा अभ्यास घरीच झाला. बालकवींची थोरली बहीण जिजी ऊर्फ लक्ष्मीबाई भावे यांनी त्यांना संस्कृतचं प्राथमिक शिक्षण दिलं; कवितेकडेही तिनेच वळवलं. बालकवींनी नंतर स्वतःच्या बळावर संस्कृतमध्ये प्रभुत्व मिळवलं. पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांचाही त्यांचा अभ्यास होता.
balkavi pustak 2.JPG
वयाच्या तेराव्या वर्षी नवापूर इथे असताना त्यांनी पहिली कविता लिहिली. ह्या कवितेला त्यांनी शीर्षक दिलेलं नव्हतं. (बालकवींच्या समग्र कवितेचे संपादक प्रा. भा. ल. पाटणकर ह्यांनी तिला ‘वनमुकुंद’ असं नाव दिलं). जळगावमधे भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात (१९०७) बालकवींनी केलेल्या काव्यवाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर ह्यांनी त्यांना ‘बालकवी’ हे नाव देऊन त्यांचा गौरव केला. तेव्हा त्यांचं वय १७ वर्षं होतं. त्यानंतर ‘बालकवी’ हे नाव रूढ झालं.
१९०८मधे बालकवींच्या वडिलांचं निधन झालं. कुटुंबातील उर्वरित दोन भाऊ स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असल्यामुळे संसाराची जबाबदारी बालकवींवर येऊन पडली, तेव्हापासून नोकरीसाठी आणि पैशासाठी बालकवींची खटपट सुरू झाली. वडिलांच्या मृत्यूनंतर एका वर्षाच्या आत गडबडीने आणि बालकवींच्या मनाविरुद्ध त्यांची आई गोदूताई यांच्या पुढाकाराने बालकवींचा विवाह नाशिकच्या पार्वतीबाई जोशी यांच्याशी करून देण्यात आला. १९०९च्या दरम्यान शिक्षणासाठी काही काळ बडोद्याला असलेल्या बालकवींची तिथेच रेव्हरंड ना. वा. टिळक यांच्याशी गाठ पडली. बालकवींची हालाखीची परिस्थिती पाहून टिळकांनी त्यांना अहमदनगरला आपल्या घरी राहण्यासाठी आणलं. टिळकांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांनी आपल्या ‘स्मृतिचित्रे’ या गाजलेल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे, ‘ठोमरे हा बालकवी होता, पण तो कवीपेक्षा बालच अधिक होता.’
यानंतरच्या काळात कधी कुटुंबियांच्या आग्रहामुळे तर कधी नोकऱ्यांमुळे पुणे व नगर अशा ठिकाणी बालकवींचा आयुष्याचा काळ विभागला गेला.
१९१८च्या उन्हाळ्यात जिजींच्या मुलीच्या विवाहासाठी खानदेशातील भादली इथे आलेले असताना बालकवींना त्यांचे कवीमित्र के. म. सोनाळकर यांचं पत्र आलं व त्यांच्याकडे जाण्यासाठी घाईघाईने रेल्वेस्टेशनकडे निघालेल्या बालकवींचा पाय रूळामध्ये अडकला. याच वेळी येणाऱ्या ट्रेनखाली अडकून बालकवींचा मृत्यू झाला.
balkavi - pustak 1.jpg
अधिक वाचनासाठी-
समग्र बालकवी – संपादक : नंदा आपटे (पॉप्युलर प्रकाशन)
बालकवींची कविता : तीन संदर्भ – रमेश तेंडुलकर (मौज प्रकाशन)
बालकवी समीक्षा – एस. एस. नाडकर्णी
बालकवींचे काव्यविश्व – म. सु. पाटील.
फुलराणी – संपादक- कुसुमाग्रज (काँटिनेन्टल प्रकाशन)

Balkavi

From Wikipedia, the free encyclopedia
BalKavi
Born Tryambak Bapuji Thombre
13 August 1890
Dharangaon,Dist-Jalgaon.(Maharashtra)
Died 5 May 1918
Bhadali Railway Station,Dist-Jalgaon.
Nationality Indian
Occupation Poet
Known for Poems in Marathi
Tryambak Bapuji Thombre (1890–1918) was an Indian Marathi poet, whose pen name was Balkavi, also spelled as Baalkavi or Baal-kavi. Poems of Thombre deal with his love of nature and are marked by exuberant language. He spent some period of his childhood life with renowned writer and poet Narayan Tilak [ Narayan Vaman Tilak (6 December 1861 – 1919) was a Marathi poet from the Konkan region of then Bombay Presidency in British India, and a famous convert to Christianity.] And Laxmibai Tilak. Narayan Tilak was the person who identified the talent within Baalkavi and brought him to his home. Laxmibai Tilak had very motherly relation with Baalkavi. She mentioned some of sweet memories of Baalkavi in her autobiography ‘smruti chitre’. [1]

Notable work[edit]

Some of his poems are very “dark” while most of them depict nature in a beautiful poetic manner.[1] Some notable poems written by Thombre are:
  • Phulrani
  • Audumber
  • Shraavan-maasii harshh maanasii
  • Anandi anand Gade jikade tikade chohikade
hu

References[edit]

  • Poems of Balkavi on Wikisource
  1. Jump up to:a b Datta, Amaresh (1987). The Encyclopedia of Indian Literature. Sahitya Akademi. ISBN 978-81-260-1803-1. Retrieved 2009-12-09.
MENU
0:00
Recording of one of Balkavi’s poem.

Problems playing this file? See media help.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s